Posts

Showing posts from August, 2019

कसा विसरला ??

Image
कसा विसरला… जीव इतुका लावून मजला मरणासन्न करताना कसा विसरला त्या विश्वाला विश्वासाने तोडताना रक्ताहूनही जवळ परी घाव जहरी देताना कसा विसरला त्या स्वप्नांना हातानी तव पुसताना कवेत आसवे सांडली मी तर आधार तुझा मी घेताना कसा विसरला त्या थेंबांना हक्क सोडून जाताना कुठले नाते कसे जोडले यातना अशी देताना कसा विसरला त्या मैत्रीला ऐपत माझी काढताना क्षणक्षण व्यापून आयुष्याचा काळीज माझं मोडताना कसा विसरला त्या कष्टांना त्याग दाखले देताना कर्णासम अवस्था माझी काय स्वकीय काय परक्यांचा सारथीनेही डाव खेळला भानावरती नसताना स्तुतीसुमने गायीन तुझी श्वास एकला उरताना होशील स्तब्ध पाहून मजला मी खांद्यांवरती जाताना

मन पाखरू

||मन पाखरू || पाहता तिला आभाळ भरून आलं !!! मन बिनपंखाच पाखरू झालं टपोऱ्या थेंबात चिंब भिजून गेलं आठवणींच्या गावात जणू रमून गेलं - मितू  

विश्वास !!

Image
विश्वास !! तीच नि त्याच नातं हे नुसतं प्रेम नाही !!  ती एक जाणीव आहे आपुलकीने जपलेली..  एक तपस्या आहे मन:पुर्वक केलेली... एक साधना आहे विश्वासात गुंतलेली...  - मितू

अढळ जागा

Image
तुझ्या खोट्या चेहऱ्यावर तू खोटेच हासू आणणार... तू ही एका नजरेत नक्कीच अश्रू ढाळणार... शोधशील मला इतरांच्या डोळ्यांत तू.... तरी मात्र माझी जागा नेहमीच रिक्त राहणार... स्वीट स्विटी

हो..मी खुश आहे

आज तुझ वागणं बघून मी खुश आहे... तुझ खोट खोट हासनं.. बघूनही मी खुश आहे.. कितीही सोबत कोणी ..असलं तुझ्या जरी... माझी छोटीशी ती जागा ..पाहून मी खुश आहे.. स्वीट स्विटी

अनामिक नातं !!

।। अनामिक नातं ।। कसा उमगतो तुला माझ्या मनाचा ठाव  कसा समजतो तुला माझ्या नयनातला भाव  तुझ्या सोबतीत सुखद भासे प्रत्येक घडीचा डाव  मग का वाटावे गरजेचे सख्या, या नात्याला  नाव ? -स्वीट स्विटी

वादळ

Image
नकोत ती वादळे  नकोत ती बंधने आता फक्त एक मागणे नको पुन्हा ते गुंतणे !! -मितू

सूर्य किरण

Image

मळभट

Image
|| मळभट ||

एकांत

Image
मिळवलेत मित्र असे जीवाला जीव देऊन झेललेत वार पार काळजात रुतून असतो जरी चार चौघात मिसळून परी मन असते एकांतात गुंतून -मितू

खेद

Image
खेद तुझ्या जाण्याचे मी कधीच केले नव्हते आशेचे दीप कधीच विझले नव्हते काट्यानाही कवेत घेऊन निवडुंगाशी प्रीती केली कातड्यांचे कागद करून रक्ताची शाई केली  स्वप्नांना विसरून मी तुझ्यात गुंतत गेलो नव्हते माहीत की कपटी मनाशी जोडत गेलो दहन करून प्रेमाचे जगाची ही रीत जुजबी केली मित्रत्वाची व्याख्या ही क्षणात बदलून गेली विश्वास नात्यावरचा पार गळून गेला आहे परातूचे दार कायमचे बंद झाले आहे भेटशील पुन्हा त्या वळणावर जर कधी तू गर्दीत विरून जाणारा एक अनोळखी असशील तू असेच जगणे आता माझे माझ्यात मी हरवून नको ते गुंतणे पुन्हा नको त्या कटू आठवणी  -मितू

पहिली चारोळी

।। पहिली चारोळी ।। गुंफली पुन्हा शब्दांची माळ गं.. ओवलेल्या अलंकारांना तुझ्या शृंगाराची साज गं