कसा विसरला ??
कसा विसरला… जीव इतुका लावून मजला मरणासन्न करताना कसा विसरला त्या विश्वाला विश्वासाने तोडताना रक्ताहूनही जवळ परी घाव जहरी देताना कसा विसरला त्या स्वप्नांना हातानी तव पुसताना कवेत आसवे सांडली मी तर आधार तुझा मी घेताना कसा विसरला त्या थेंबांना हक्क सोडून जाताना कुठले नाते कसे जोडले यातना अशी देताना कसा विसरला त्या मैत्रीला ऐपत माझी काढताना क्षणक्षण व्यापून आयुष्याचा काळीज माझं मोडताना कसा विसरला त्या कष्टांना त्याग दाखले देताना कर्णासम अवस्था माझी काय स्वकीय काय परक्यांचा सारथीनेही डाव खेळला भानावरती नसताना स्तुतीसुमने गायीन तुझी श्वास एकला उरताना होशील स्तब्ध पाहून मजला मी खांद्यांवरती जाताना