खेद
खेद तुझ्या जाण्याचे मी कधीच केले नव्हते
आशेचे दीप कधीच विझले नव्हते
काट्यानाही कवेत घेऊन निवडुंगाशी प्रीती केली
कातड्यांचे कागद करून रक्ताची शाई केली
स्वप्नांना विसरून मी तुझ्यात गुंतत गेलो
नव्हते माहीत की कपटी मनाशी जोडत गेलो
दहन करून प्रेमाचे जगाची ही रीत जुजबी केली
मित्रत्वाची व्याख्या ही क्षणात बदलून गेली
विश्वास नात्यावरचा पार गळून गेला आहे
परातूचे दार कायमचे बंद झाले आहे
भेटशील पुन्हा त्या वळणावर जर कधी तू
गर्दीत विरून जाणारा एक अनोळखी असशील तू
असेच जगणे आता माझे माझ्यात मी हरवून
नको ते गुंतणे पुन्हा नको त्या कटू आठवणी
-मितू
-मितू

Comments
Post a Comment